भाजपची तिरंगा रॅली / तरुणांचा मोठा सहभाग / माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची रणनीती
माय अहमदनगर वेब टीम -
संपुर्ण देशात सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणत तरुण बांधव या योजनेत सहभागी होताना दिसत आहेत. सर्वांनी या योजनेत वाहून घेण्याचे ठरवले आहे. त्याच धर्तीवर शनिवारी वाळकी, दरेवाडी, अरणगाव गटातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या नियोजनातून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शिराढोण येथून या रॅलीस सुरुवात करण्यात आली. जवळपास ४०० ते ५०० मोटार सायकल यात सहभागी झाल्या होत्या. कोणत्याही गोष्टीत तरुण पुढे आल्याशिवाय ती गोष्ट यशस्वी होत नाही अगदी तशाच प्रकारे या मोहिमेत तरुण बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या योजनेला भव्य - दिव्य स्वरूप दिले. महाविकास आघाडीच्या या तिन्ही बालेकिल्ल्यात कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीने सर्वांची मने जिंकली. या रॅलीत माजी सभापती अभिलाष घिगे, हरिभाऊ कर्डिले, सुधीर भापकर, दादा दरेकर, मोहन गहीले, माजी उपसभापती रेवण चोभे, संतोष म्हस्के, भरत भुजबळ, रविंद्र अमृते, बाळासाहेब मेटे, अंकुश नवसुपे, केशव वाबळे, विलास भांबरे तसेच अनेक तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या रणनीतीचा मोठा फायदा भाजपा कार्यकर्त्यांना होणार आहे. देशाच्या रक्षणासाठी आणि अस्मितेसाठी भाजप सरकार केंद्र पातळीवरुन प्रयत्न करत आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थासुध्दा आपल्या ताब्यात याव्यात यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.
Post a Comment