मांडओहोळ, रुईचोंडा....
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
नगर येथील नगर कल्याण रोडवर पारनेर तालुक्यातील नगरपासून ५० कि मी वर असणारे मांडओहळ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग ४ थ्या वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने पर्यटकांसह शेतकरी तालुका वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांडओहळ प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात अखेर 399 पैकी 380 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
मागील वर्षी धरण परिसरा मध्ये कोरोना मुळे पर्यटकांना जाण्यास बंदी होती ,फक्त पाहण्यास परवानगी होती. यावर्षी मात्र या ठिकाणी पाण्यात भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. येथे जवळच असलेला रुईचोंढा धबधबा नगरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो, मात्र पर्यटकांनी काळजी घेण्याचे गरज आहे.
Post a Comment