माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका -नगर तालुक्यातील निमगाव वाघा गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य भरत बोडखे यांची काँग्रेस पक्षाच्या नगर तालुका उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
नगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण म्हस्के यांनी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते बोडखे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. अरुण म्हस्के यांनी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये नगर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी भरत बोडखे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
भरत बोडखे यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदान संपूर्ण तालुक्याला परिचित आहे. स्व. माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे विश्वासू सहकारी म्हणून बोडखे कुटुंबाकडे पाहिले जाते. नवनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रात सेवा करत आहेत. निमगाव वाघा गावचे ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी गाव विकासासाठी घेतलेले निर्णय लक्षवेधी ठरले होते.
नगर तालुक्याला काँग्रेस पक्षासाठी भरत बोडखे यांच्या रूपाने तरुण चेहरा मिळाला आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जोमाने पक्षवाढ व आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन बोडखे यांनी केले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात शाखा उघडून तरुणांचे संघटन वाढविण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाला अच्छे दिन आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोडखे यांनी सांगितले. बोडखे यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरामधून अभिनंदन होत आहे.
---------------------------------------------------------------------
पक्षाला उर्जितावस्थेत आणणार
काँग्रेस पक्षाला नगर तालुक्यात ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहे. तरुणांचे संघटन व प्रत्येक गावात शाखा उघडण्याचे काम करण्यात येणार आहे. गाव तिथे शाखा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण तसेच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. वरिष्ठांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरवत दिलेली जबाबदारी पार पाडणार आहे.
....भरत बोडखे ( काँग्रेस आय नगर तालुका उपाध्यक्ष)
____________________________________
Post a Comment