माय अहमदनगर वेब टीम
तुम्ही काय खात आहात यावर नजर ठेवण्यासोबतच तुम्ही दिवसातून किती प्रमाणात आणि किती वेळा खात आहात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आयुर्वेद पचनशक्ती (पाचक अग्नी) टिकवून ठेवण्याचा सल्ला देतं. जेव्हा तुम्हाला खरोखर भूक लागते तेव्हाच खाल्ल्याने हे साध्य होऊ शकते. समजा, जर तुम्ही दिवसातून ४ ते ५ वेळा खाणा-या व्यक्तींपैकी एक असाल तर भूक लागल्यावरच तुम्ही खात आहात ना… याची खात्री करा. आणि तेही कमी प्रमाणातच खाण्याचा प्रयत्न करा. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार, पाश्चात्य संस्कृतीत दिवसातून तीन वेळा जेवण केले जाते. जे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर या तीन वर्गात विभागले गेले आहेत.
अनेक आहारतज्ञ भूक नियंत्रित ठेवण्यासाठी या तीन वेळांमध्ये दोन एकस्ट्रा स्नॅक्स (सकाळी आणि दुपारी) अॅड करण्याचा सल्ला देतात. तर काही तज्ञांचे मत आहे की दिवसातून पाच ते सहा वेळा खाणं गरजेचं आहे. अलीकडेच, आयुर्वेद आणि आतडे आरोग्य प्रशिक्षक, डॉ. डिंपल जांगडा यांनी, आरोग्यावर आधारित एका दिवसात खाल्ल्या जाणा-या जेवणाच्या संख्येचा प्रभाव आणि परिणाम याबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या आरोग्यासाठी दिवसातून किती वेळा जेवणे किंवा काही खाणे फायदेशीर आहे ते येथे जाणून घेऊया.
डॉ. डिंपल जांगडा सांगतात की, जेव्हा एखादा रुग्ण असंतुलन, आजार किंवा विकाराच्या अवस्थेत आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्याला दिवसातून चार ते पाच वेळा जेवण्याचा किंवा काहीतरी खाण्याचा सल्ला देतो. पण जे खात आहे त्या गोष्टीचे प्रमाण मात्र फारच कमी ठेवायला सांगतो, ते त्यांच्या भूकेच्या 50% ते 80% पेक्षाही कमी असते.
डॉक्टर सांगतात की, आजारी असताना शरीरात जीवनसत्त्वे (vitamins) आणि खनिजांची (minerals) कमतरता असल्यामुळे ते भरून करणारे पदार्थ जास्तीत जास्त खावेत. यामध्ये फळे, चांगल्या प्रकारे शिजवलेल्या भाज्या, धान्ये, शेंगा, डाळी, नट्स, वाळवलेल्या बिया, दुग्धजन्य पदार्थ किंवा प्लांट बेस्ड दूध यांचा समावेश होतो.
जेव्हा तुमच्यात उर्जेची कमतरता असते, भूक लागते किंवा तुम्ही कोणत्यातरी आजारातून बरे होण्याच्या प्रक्रियेत असता तेव्हा दिवसातून 4 वेळा खाणे उपयुक्त ठरते. पण अशावेळी फक्त भूक लागल्यावरच खात आहात ना.. याची खात्री करा. भूकेच्या फक्त 80% भागच खा, सूर्यास्तानंतर जड जेवण किंवा पदार्थ खाणे टाळा आणि झोपेच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवा. जर तुम्हाला रात्री उशीरा झोपताना किंवा मध्यरात्री भूक लागली असेल तर तुम्ही चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चिमूटभर जायफळ किंवा चिमूटभर हळद घालून दूध पिऊ शकता.
जर तुम्ही हेल्दी असाल किंवा आजारी नसाल तर दिवसातून 3 वेळा खा. हा संतुलित जीवनशैलीचा एक भाग आहे जिथे तुम्ही सूर्यास्तापूर्वी हलकासा नाश्ता, लंचमध्ये भरपेट जेवण आणि रात्रीचे सुर्यास्ताआधी हलका-फुलका डिनर करावा. या टाइमटेबलनुसार तुम्ही 14 ते 16 तासांचा गॅप घेऊन खात असता जे शरीरासाठी एकदम परफेक्ट असते. तथापि, योगामध्ये जो कोणी दिवसातून 3 वेळेपेक्षा जास्त वेळा जेवतो त्याला रोगी म्हणतात, म्हणजे ज्या व्यक्तीची कालांतराने भविष्यात अपाच्य चयापचय कचरा जमा झाल्यामुळे लवकर आजार होण्याची शक्यता असते.
योग आणि आयुर्वेदानुसार खाण्याचा हा एक आदर्श मार्ग आहे. हे तुम्हाला दोन्ही जेवणांमध्ये 6 तासांचे अंतर देते जे थांबून थांबून खाण्याची आयुर्वेदिक पद्धत आहे. पुढील जेवण सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या शरीराला पोषक तत्वे पूर्णपणे पचण्यासाठी, शोषून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी वेळ देता. दिवसातून दोनदा जेवणाऱ्या व्यक्तीला योगामध्ये भोगी म्हणतात, याचा अर्थ अन्नाचा पूर्णपणे आस्वाद घेणारा व्यक्ती.
जेव्हा तुम्ही तुमच्या चांगल्या आरोग्याच्या आणि हेल्दी चयापचयाच्या किंवा पचनक्रियेच्या पातळीपर्यंत पोहोचता तेव्हा तुम्ही दररोज दिवसभरातून एकदाच जेवणाची जीवनशैली स्वीकारू शकता. अशा व्यक्तीला प्रखर विचार, उच्च बौद्धिक आणि अध्यात्मिक क्षमता असलेला योगी म्हणतात, असे लोक त्यांच्या शरीराच्या हलकेपणामुळे अधिक यशस्वी व सकारात्मक राहतात.
Post a Comment