हिंगणगावच्या उपसरपंचपदी वैभव ताकपेरे यांची निवड दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाणारे गाव झाले पाणीदार- सरपंच सोनवणे

 माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील हिंगणगावच्या उपसरपंच सौ.नीलम दुबे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागी वैभव बाबासाहेब ताकपेरे यांची सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली.

    पीठासन अधिकारी म्हणून लोकनियुक्त सरपंच व अहमनगर जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत सदस्य दिलीप झावरे  उपसरपंच पदासाठी वैभव ताकपेरे यांच्या नावाची सुचना मांडली. त्यास ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पानसरे यांनी अनुमोदन दिले. सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहमती दर्शवली त्यामुळे ताकपेरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी दिली.

      विद्यमान लोकनियुक्त सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्या सहकार्यांनी व गावातील जेष्ठांच्या व तरुण वर्गाच्या मार्गदर्शनानुसार गावचा सर्वांगीन विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच वैभव ताकपेरे यांनी सांगितले. 

     यावेळी सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी कोरोना काळातील दोन वर्षे हे प्रत्येक ग्रामपंचायतीला फार अडचणीची आणि विकासाचे बाबतीत ठप्प गेले असतानाही गावामध्ये जलयुक्त शिवार योजना लोकसहभाग व शासनाच्या सहकार्याने अत्यंत प्रभावीपणे राबवली असल्याचे सांगितले. तसेच कुरणमळ्यासाठी पिण्याचे पाणी व नळ कनेक्शन, नदी जोड प्रकल्प,मुख्यमंत्री सडक योजनेतून जखणगाव ते हिंगणगाव व हिंगणगाव ते निंबळक रस्ता, 25/15 योजनेतून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुरणमळा रस्ता, जिल्हा परिषद निधीतून बिरोबा रस्ता, खातगाव रस्ता यांचेही मजबुतीकरण, खडीकरण,डांबरीकरण केले असल्याचे सांगितले.  




      हिंगणगाव प्राथमिक शाळेच्या दोन टप्प्यांमध्ये एकूण पाच नवीन शाळा खोल्या बांधून पूर्ण केल्या आहेत. तसेच जन सुविधा योजनेतून स्मशानभूमी शेड, पेव्हींग ब्लॉक, बसण्यासाठी ओटे ही कामे केली. तसेच पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्ती इत्यादी कामे केली आहेत. खारे कर्जूने ते हिंगणगाव या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून, आमदारांच्या सहकार्याने जिमचे 5 लाख रु. किमतीचे साहित्य बसवून व्यायाम शाळा सुसज्ज बनवली आहे. तसेच अंतर्गत भूमिगत गटार, रस्ते काँक्रीटकरण करणे, गावातील रमाई आवास योजना प्रभावी राबवून बहुतेक घरकुले पूर्ण होऊन काही पूर्णत्वाचे मार्गावर आहेत. पंतप्रधान आवास योजनाही प्रभावीपणे राबवून गावचे सर्व वंचित गरिबांना घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत. 

      जल जीवन मिशन अंतर्गत गावातील सर्व जुन्या लाईन बदलून नवीन लाईन टाकणे प्रत्येक वाड्या वस्त्या करिता प्रस्थापित नवीन 4 पाण्याच्या उंच टाक्या बांधणे. हा सुद्धा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी व घनकचरा वाहतुकीसाठी पाच लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच गावातील ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी नाबार्ड योजनेतून 2कोटी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

     गावठाण अंतर्गत सर्व वाकलेले पोल, डीपी दुरुस्ती, नवीन खांब टाकणे, खाली आलेल्या तारा ओढणे ही सर्व कामे वीज वितरण कंपनीकडून करून घेण्यात आली आहे. त्यामुळे सतत लाईट खंडित होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.गावात 4 ठिकाणी हाय मॅक्स बसवण्यात आले आहेत. तसेच दलित वस्तीसाठी 7 लाख रुपयांचे आंबेडकर भवनाचे काम मंजूर असून त्याचेही काम लवकरात लवकर सुरू होणार आहे.तसेच हिंगणगाव जिल्हा परिषद शाळा लवकरच डिजिटल होणार असून एक वेगळे मॉडेल म्हणून प्रकल्प राबवणार आहेत. गावांमध्ये उंबर नाला व जामगाव नाल्यावर मिळून 11 बंधारे बांधण्यात आले आहेत व एकूण 11 किमी खोलीकरण करण्यात आले आहे. हिंगणगावची दुष्काळी गावाची ओळख पुसून एक पाणीदार गाव म्हणून ओळख निर्माण झाली असल्याचे  सोनवणे यांनी सांगितले. 

    याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीप झावरे, बाळासाहेब पानसरे आशाबाई ढगे, मोहिनी सोनवणे, नीलम दुबे, सुनील सोनवणे, त्रिंबक कोल्हे, भाऊसाहेब सोनवणे, मीराभाई सय्यद, नंदू सोनवणे, संजय शिंदे, दत्तात्रय सोनवणे, विश्वास सोनवणे, संभाजी कोल्हे, किरण खोडदे, निसार पठाण, ग्रामसेविका सौ. संगिता देठे, मयूर सुंबे, वैभव ढगे, योगेश ताकपेरे, शिवाजी पाडळे अश्पाक शेख, गोरख पानसरे, सिद्धांत पानसरे, संदीप पाडळे, पै.योगेश पाडळे, निखिल देशमुख, शुभम सोनवणे, संकेत कांडेकर श्रेयस सोनवणे,निलेश सोनवणे, सचिन कांडेकर, प्रफुल सोनवणे, अनिकेत मोरे, निखील पवार व हिंगणगाव ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

----------------------------------------------------------------------

सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्या कार्याची तालुक्यात चर्चा

हिंगणगाव येथील लोकनियुक्त सरपंच आबासाहेब सोनवणे यांनी गाव विकासासाठी गावांमध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांची तालुक्यात चर्चा होत आहे. सोनवणे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली हिंगणगावचा कायापालट झाला आहे. विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कामे करता आल्याचे सोनवणे सांगत आहेत. आबासाहेब सोनवणे यांच्या कार्याचा तालुक्यातील इतर गावांनी आदर्श घेण्याची गरज आहे.

______________________________________________


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post