माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर औरंगाबाद महामार्गावर लहान मोठे खड्डे पडलेले असून अपघातांची संख्या वाढलेली आहे. महामार्गावरील खड्डे बुजून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गणेश आवारे यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद महामार्गावर नगर ते घोडेगाव दरम्यान मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दररोज अपघात घडत आहेत. खड्ड्यांनी पावसाचे पाणी साचल्यानंतर वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळेही अपघातांची संख्या वाढतच आहे.
महामार्गाची दुरावस्था झाली असून अपघातात निष्पापांचे बळी जात आहेत. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. अपघातात बळी गेलेल्यांचे संसार उघड्यावर येत आहेत. रस्त्यावर नावालाच खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत असून दोन दिवसात पुन्हा खड्डे पडत आहेत.
तरी नगर औरंगाबाद महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते गणेश आवारे यांनी दिला आहे.
----------------------------------------------------------
नगर औरंगाबाद महामार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघातांची संख्या खूपच वाढलेली आहे. अपघातामध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. त्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे परिसरात दररोज अपघात घडत आहेत. तरी नगर औरंगाबाद महामार्गाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
..... गणेश आवारे (संस्थापक अध्यक्ष गणेश आवारे युवा प्रतिष्ठान)
________________________________________
Post a Comment