माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील पांगरमल परिसरातील गावच्या विद्यार्थ्यांचे बस अभावी शैक्षणिक नुकसान होत होते. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नामुळे बस सुरू झाली असल्याची माहिती पांगरमलचे सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पांगरमल परिसरातील केशव शिंगवे, खोसपुरी, पांढरीपुल या परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मिरी येथे शिक्षणासाठी जात आहेत. परंतु विद्यालयाच्या वेळेत व विद्यालय सुटल्यानंतर एस. टी. महामंडळाची बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांचे बस अभावी हाल सुरू होते.
विद्यार्थ्यांच्या बस अभावी होणाऱ्या गैरसोयीबद्दल माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी एस. टी. महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ बस सुरू करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर बस सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असतात परंतु पांगरमल परिसरात बस अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यामुळे बस सुरू झाली आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कर्डिले यांचे आभार मानले आहे.
यावेळी सरपंच बापूसाहेब आव्हाड, देविदास आव्हाड, आप्पासाहेब आव्हाड, बबनराव आव्हाड, नवनाथ आव्हाड, महादेव आव्हाड, भास्कर आव्हाड, खंडेराव आव्हाड, एकनाथ आव्हाड, अजित आव्हाड, जालिंदर आव्हाड, सचिन आव्हाड, रामदास वाकडे, नवनाथ आव्हाड, भगवान आव्हाड उपस्थित होते.
____________________________________
सरपंच बापुसाहेब आव्हाड यांच्या कार्याचे कौतुक
पांगरमल गावचे युवा सरपंच बापुसाहेब आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पांगरमल गावात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. गावचा कायापालट होत आहे. गावामध्ये ग्रामस्थांच्या हिताच्या विवीध योजना राबविण्यात येत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
_______________________________________
Post a Comment