माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील बहिरवाडी येथे ई- पीक पाहणी ॲप बाबत ग्रामपंचायत, महसूल तसेच कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद ही ई-पीक पाहणी ॲप द्वारे करणे बंधनकारक करण्यात आहेले आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना वारंवार आवाहन, प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. परंतु शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. ई-पीक पाहणी ॲपबाबत शेतकऱ्यांना अद्यापही पुरेसे ज्ञान नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकाची नोंदच करत नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असून अतीवृष्टीमुळे मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार नाही.
बहिरवाडी येथे ई- पीक पाहणी ॲपसंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. सरपंच सौ. अंजना येवले, तलाठी सरिता मुंडे, कृषी सहाय्यक धनराज गुंड, दशरथ दारकुंडे यांनी ई- पीक पाहणी ॲप द्वारे आपल्या पिकाची नोंद कशी करावयाची याबाबतची माहिती ग्रामस्थ व महिलांना दिली. तसेच सर्व नागरिकांनी आपल्या पिकांची नोंद करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
__________________________
नोंद कशी कराल
प्ले स्टोअरवरून ई- पीक पाहणी ॲप व्हर्जन २ डाउनलोड करावे. ज्या शेतातील पिकाची नोंदणी करायची त्या शेतात जावे. त्यानंतर क्रमाक्रमाने विचारलेली माहिती भरावी. आपल्या पिकाचा फोटो अपलोड करून ई- पिकाची नोंद करावी.
..... सरिता मुंडे (तलाठी बहिरवाडी)
____________________________
ज्या शेतकऱ्यांनी ई- पीक पेऱ्याची नोंद केलेली नाही. त्यांनी १५ ऑक्टोबर पर्यंत नोंद करून घ्यावी. अन्यथा अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळणार नाही. तरी सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक पेऱ्याची नोंद करून घ्यावी. काही अडचण असल्यास महसूल विभागाशी संपर्क साधावा.
..... अंजना येवले (सरपंच, बहिरवाडी)
______________________________________
Post a Comment