थोर पुरुषांच्या विचाराने समाजाची प्रगतीच- सरपंच येवले

माय अहमदनगर वेब टीम



 नगर तालुका- थोर पुरुषांचे विचार आचरणात आणल्याने स्वतःबरोबर समाजाची प्रगतीच होत असल्याचे प्रतिपादन बहिरवाडीच्या सरपंच सौ. अंजना येवले यांनी केले आहे.

     राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती बहिरवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन सरपंच अंजना येवले, उपसरपंच मधुकर पाटोळे, भाजप तालुका उपाध्यक्ष राजु दारकुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.



     यावेळी बोलताना सरपंच सौ. येवले यांनी आपल्या देशात अनेक संत, महान पुरुष होऊन गेले. त्यांची शिकवण, त्यांचे आचार विचार आजही जगाला प्रेरणा देत आहेत. थोर पुरुषांचे विचार आचरणात आणले तर स्वतःबरोबर समाजाची प्रगती होत असते. आज समाजाला महान पुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे येवले यांनी सांगितले.

    यावेळी अपंग दिव्यांग व्यक्तींना सतरंगी वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य सावळेराम चव्हाण, सौ. कांता दारकुंडे, सौ. सुनीता जरे, सौ. अलका काळे, ग्रामसेवक योगेश साबळे, सौ. कल्याणी दारकुंडे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post