कृषीमंत्री अब्दुल सत्तारांना आमदार नीलेश लंके यांचे खुले आव्हान; नगरमधून जाऊनच दाखवा....

 


माय नगर वेब टीम 

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार नीलेश लंके मंत्री अब्दुल सत्तार यांना जाहिर आव्हान दिले आहे. ते म्हणाले, सरडा अब्दुल सत्तार नगरमधून पुढे कसा जातो, मी पाहतो. तु कसाही ये पोलिस संरक्षणात, लाल दिव्यांच्या गाडयांच्या गराडयात ये तुला पुढे जाऊ देणार नाही. तुझ्या गाडया फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले.

आ. लंके म्हणाले, महाराष्ट्राला एक परंपरा आहे. राज्याचा एक मंत्री सुप्रियाताईं विषयी अपशब्द वापरतो हे निषेधार्ह आहे. पन्नास खोके हा विषय संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यांचेच मंत्री तुम्हाला पन्नास खोके हवेत का असा सवाल करतात. त्यावर सुप्रियाताईंनी भाष्य केले तर सत्तार यांना का झोंबते ? सत्तार हा सरडा आहे. सत्तारला सत्तेचा माज आला आहे. मी सत्तार याला जाहिर आव्हान करतो, तुझ्या मागे पुढे लाल दिव्यांच्या गाडया घेऊन फिरतो ना ? तुला नगर जिल्हयातून पुढे कसा जाऊ देतो ते मी आता पाहतो.

ज्या सुप्रियाताईंना अनेक वर्षे संसदेने संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांनी कधीही कोणाविषयी अपशब्द वापरले नाहीत. अशा आदरणीय ताईंबद्दल अपशब्द वापरणे हे सत्तार याला शोभले पाहिजे. मंत्री म्हणून काम करण्याची त्याची लायकी नाही. तुला जाहिर आव्हान आहे, पोलिस ताफा घेऊन ये किंवा कसाही ये तुला कसे पुढे जाऊ दिले जाते ते पाहतो. तुझ्या गाडया फोडण्याचे काम आम्ही करू हे आम्ही जाहिरपणे सांगतो. माय बहिणींविषयी असे वक्तव्य करणारांचा मी निषेध करीत असल्याचे आ. लंके म्हणाले.


अब्दुल सत्तार च्या प्रतिक्रियेवर जितेश सरडे यांनी व्यक्त केला संताप


महाराष्ट्राचे प्रश्‍न संसदेत मांडून ते कसे मार्गी लावले जातील यासाठी सुप्रिया सुळे यांनी नेहमीच महत्वाची भुमिका मांडली. त्यामुळेच त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्याच ताईंविरोधात दुर्देवाने राज्याचा कृषी मंत्री झालेल्या अब्दुल सत्तारचा मी निषेध करतो. खरं तर सत्तार ही तुझी चुकी नाही, या राज्यात ज्यावेळी सत्तांतर झालं, त्यावेळी माझ्या माता भगिनींना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं नाही यावरून तुम्हाला त्यांच्याप्रती किती सन्मान आहे हे स्पष्ट होते. पुजा चव्हाणवर अत्याचार करणारा संजय राठोड तुम्ही मंत्री केला. तेव्हढ्यावरच न थांबता सर्वसामान्य घरातून येऊन सामान्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठविणाऱ्या सुषमा अंधारे यांना एखादा मंत्री नटी म्हणत असेल तर ती त्यांची चुकी नाही. त्यांचे नेते सांगतात हिंदुत्वासाठी गट स्थापन केलाय. त्यांना एकच सांगायचंय की स्त्री ही हिंदूंच्या देव्हाऱ्यातील देवता आहे. तिचा अपमान कसा सहन केला ? साडेतीनशे वर्षांपूर्वी राजे शिवाजी महाराजांनी माता भगिनींविषयी आदर्श शिकविला होता. आता तुमची हिंदुत्वाची शिकवण कुठे गेली असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी केला.


अब्दुल सत्तार ची पारनेर मध्ये दिंड काढणार : राजेश्वरी कोठावळे

अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य हे चुकीचे असून सुप्रिया सुळे यांच्या बद्दल त्यांनी आपत्तीजनक अश्लील भाषेत जे वक्तव्य केले त्याचा विविध ठिकाणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निषेध करण्यात येत आहे. त्यामुळे अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजेश्वरी कोठावळे यांनी जाहीर निषेध केला आहे. पारनेर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवार दि. ८ नोव्हेंबर सकाळी दहा वाजता पदाधिकाऱ्यांच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याची गाढवावरून दिंड काढून त्यांच्या तोंडाला काळ फासण्यात येणार असल्याचे अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post