माय नगर वेब टीम
अहमदनगर - राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी जे अपशब्द काढले त्याचा निषेध करून राहुरी येथे मंत्री सत्तार यांचा पुतळा जाळण्यात आला. तसेच त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.
यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, आमचे श्रद्धास्थान असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी मंत्री सत्तार यांनी अपशब्द वापरले आहेत. ते त्यांनी त्वरित मागे न घेतल्यास त्यांना नगर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही. तसेच येत्या काही दिवसात ते राहुरी कृषी विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी येणार असून त्यांचा यावेळी तीव्र निषेध करून त्यांचा कार्यक्रम होऊ देणार नसल्याचा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष आघाव, जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे, उपसभापती रवींद्र आढाव,तालुका सहचिटणीस सलीम शेख, महिला शहराध्यक्षा अपर्णा ढमाळ, संगीता आहेर आदी उपस्थित होते.
Post a Comment