जल जीवन मिशन महत्त्वकांक्षी योजना- माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एमआयडीसी ते अरणगाव (मेहराबाद) पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-गावागावात शुद्ध पाणी मिळाले पाहिजे ग्रामीण भागातील महिलांचा डोक्यावरील हंडा उतरला पाहिजे पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली पाहिजे, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही योजना राबवली ही एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एमआयडीसी ते अरणगाव (मेहराबाद) येथे पंधरा कोटी 59 लाख 78 हजार 450 रुपये कामाचे भूमिपूजन कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, हाउसिंग सोसायटीचे चेअरमन किसनराव लोटके, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के, दीपक कार्ले, पोपटराव पुंड, मेहेर बाबा चे विश्वस्त मेहरनाथ कलचुरी, रमेश जंगले, राजू प्रसाद, महेश पवार, आनंदा शेळके, अरणगाव सरपंच स्वाती गहिले, उपसरपंच नंदा करांडे, मोहन गहिले, सदस् बबन शिंदे, पोपट शिंदे, मनीषा गहिले, संतोष शिंदे, संपत कांबळे, शितल ससाने, वैशाली पुंड, लता शिंदे, मीरा कांबळे, सुनीता जाधव, वर्षा कांबळे, गणेश दळवी, सागर कलापुरे, सूर्यभान जाधव, बाळासाहेब शिंदे, बापू कुलट, गंगाधर शिंदे, पोपटराव पुंड, बाबा महाराज शिंदे, भाऊसाहेब मोरे, रमेश आजबे, सुजित कोके, एकनाथ देवकर, ताराबाई गहिले, रावसाहेब व्यवहारे, शिवाजी मोरे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्डिले म्हणाले की 50% केंद्र सरकार 50% राज्य सरकारने या योजनेसाठी दिली असून नगर जिल्ह्यासाठी बाराशे कोटी उपलब्ध करून दिले आहेत. भौगोलिक परिस्थिती पाहता नगर तालुका हा दुष्काळी भाग आहे. पाऊस संपल्यानंतर पाण्याचे हाल होतात 1995 आली अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बुरानगर आणि 44 गावात प्रादेशिक पाणी योजना राबवली यामुळे बुरानगर आणि गावाचा विकास झाला शहरापासून अरणगाव जवळ आहे. परंतु पाणी नसल्यामुळे विकास खुंटला आहे आता लवकरात लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे गावचा विकास होईल गावाच्या विकासासाठी गावातील सर्व लोक राजकारण बाजूला ठेवून एकत्र येतात ही एक कौतुकाची बाब आहे. खासदार सुजय विखे, आमदार निलेश लंके यांचे ही योजना आणण्यासाठी मोठे सहकार्य लाभले आहे. जलजीवन योजना देण्यासाठी सोर्स पाहिला जातो तेव्हा ही योजना मिळते. शंभर टक्के पाणीपट्टी भरून गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
यावेळी प्रास्ताविकात बबन करंडे यांनी सांगितले की जलजीवांमुळे गावकऱ्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असून अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला आहे. एमआयडीसी पासून 23 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी ही डी आय पाईप मध्ये असून 26 किलोमीटर अंतर्गत जलवाहिनी एचडीपी पाईप मध्ये असेल एक लाख वीस हजार लिटर एक पाण्याची टाकी नाट वस्ती येथे असून 80 हजार लिटर पाण्याची टाकी अग्नेयशाळे जवळ असेल एमआयडीसी पंपिंग हाउसिंग मध्ये 25 एचपी पंपाने पाणी उपसले जाईल. 9 लाख 45 हजार लिटर पाणी रोज गावला मिळणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच महेश पवार म्हणाले की जलजीवन मिशन अंतर्गत एमआयडीसी ते आरणगाव (मेहराबाद) पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले असून ध्यास गावच्या पाणी योजनेचा कटिबद्धेतून आम्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य मिळून गावकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण केले असल्यामुळे त्याचा मला आनंद आहे. इथून पुढेही गावच्या विकासासाठी हेवेदावे बाजूला ठेवून सर्व एकत्र येऊन गावचा विकास साधणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सरपंच स्वाती गहिले मनीषा गहिले आनंदा शेळके किसनराव लोटके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
Post a Comment