माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगरच्या एमआयडीसीमधील उद्योगाना स्थानिक युनियन मुळे घरघर लागली. तिची पुनावृत्ती ही नगर तालुका बाजार कृषी समितीत होवू नये शेतकऱ्याची कामधेनू वाचली पाहिजे यासाठी सर्वांनी बाजार समिती मध्ये लक्ष देण्याची गरज आहे असे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी आयोजीत पत्रकार परीषद मध्ये सांगीतले.
नगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनागोंदी कारभाराबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य शरद झोडगे, माजी पंचायत समिती सभापती रामदास भोर, शिवसेना तालुका प्रमुख राजू भगत,उपतालुकाप्रमुख प्रकाश कुलट यावेळी उपस्थित होते.
पावसाने उघडीप दिल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आली होती. सोमवारी सकाळी लिलाव सुरु झाले. परंतु, गेल्या लिलावापेक्षा तब्बल दोन हजार रुपयांनी कांद्याचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विरोध करत कांद्याचे लिलाव बंद पाडले. आडते-व्यापाऱ्यांकडून होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबवावी, कांद्याला योग्य भाव द्यावा, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. बाजार समितीमध्ये आडतेच व्यापारी झाल्याने शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जात असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले.
या बाजार समितीत बाहेरचे व्यापारी आले पाहिजे. त्यांच्यात माल घेणे स्पर्धा झाली पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव मिळेल. बाजार समितीचा सेस वाढून फायदा होइल, अन्यथा एमआयडीसी सारखीच बाजार समितीची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.
जिल्ह्याची कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे. जर आपण विश्वास दाखवू त्यावेळेसच कृषी उत्पन्न बाजार समिती जगणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी याबात आरोप केला की बाजार समितीत बाहेरचे व्यापारी दिसत नाही. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे असून, त्याबाबत अभ्यास करणे गरजेचे आहे. कांदयाच्या गोण्या कोणत्या किंमतीत गेल्या याची सविस्तर माहिती बाजार समितीने देणे गरजेचे आहे . तसेच बाजार भावाचे फलक बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर लावले शेतकयाना बाजार भावाची माहीती होईल . बाजार समितीचे मध्ये कांदा लिलावात नियोजन नसल्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आडतेच व्यापारी असल्यामुळे कमी भाव या बाजार समिती मध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे.
Post a Comment