युवतीचा पाठलाग करणे तरूणाला भोवले



माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर- सप्टेंबर 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत वेळोवेळी पाठलाग करून युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अविनाश बाजीराव भनगडे (रा. जुना कार्ट समोर, कोर्ट गल्ली, नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगरात राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी युवती शाळेत असल्यापासून अविनाश भनगडे याला ओळखत होती. फिर्यादी नोव्हेंबर 2021 मध्ये एक दिवस कामावरून घरी येत असताना अविनाशने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत त्यांचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते. तसेच 19 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी फिर्यादी मित्रासोबत त्याच्या दुचाकीवरून कामानिमित्त दिल्लीगेट येथे गेली असता अविनाशने त्यांना पाहिले होते. यानंतर अविनाशने फिर्यादीच्या मित्राला फोन करून धमकी दिली होती. पीडित युवतीने सगळा प्रकार घरी सांगितल्यानंतर याप्रकरणी अविनाश भनगडेविरोधात सोमवार, 7 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post