माय नगर वेब टीम
अहमदनर - नगर मनमाड या मार्गाच्या कामासाठी नव्याने ८०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला असून जानेवारी महीन्यातच या मार्गाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून या मार्गाचा निधी निविदा प्रक्रिया तातडीने व्हावी म्हणून खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे मागील काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता.आज झालेल्या निर्णयामुळे या पाठपुराव्याला यश आले असल्याचे खा.विखे पाटील यांनी सांगितले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून रस्ते विकासाचा मोठा कार्यक्रम सुरू असून याचाच एक भाग म्हणून नगर मनमाड या मार्गाचे काम कमी कालावधीत आणि गूणवतापूर्ण पध्दतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने या मार्गाकरीता ८०० कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला असून त्याची निविदा प्रक्रीया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. जानेवारी महीन्यातच या मार्गाच्या कामाला सुरूवात करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारचे असल्याचे खा.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
Post a Comment