माय नगर वेब टीम
अहमदनगर - पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात तरुणाचा विषारी औषध घेऊन आत्महत्या कारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिगंबर शिंदे (वय 21, रा. शेवगाव, जि. अहमदनगर) असे या तरुणाचे नाव असून त्याला उपचार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
शेवगाव तालुक्यातील मुरमी येथील एका कुटुंबियांकडून त्रास होत होता. त्याबाबत त्यांनी पोलिस अधिक्षक कार्यालयास त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात 14 ऑक्टोबर 2022 रोजी लेखी तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्यावर शेवगाव पोलिसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आज गुरुवारी दुपारी पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु हा प्रकार लक्षात येताच तेथील पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Post a Comment