माय नगर वेब टीम -
IND vs ZIM T20 World Cup : साऊथ अफ्रिकेच्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट निश्चित झालंय. त्यानंतर मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि झिमबॉब्वे यांच्यात सुपर स्टेजचा शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना झिमबॉब्वेची फलंदाजी पत्त्यासारखी ढासळली. अखेर इंडियाने झिमबॉब्वेचा 71 धावांनी पराभव केला आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली. मात्र, कॅप्टन रोहित शर्मा लवकर बाद झाला. विराट आणि रोहितने जबाबदारीने खेळत झिमबॉब्वेचं रान उठवलं. जोरदार फटकेबाजी करत राहूलने अर्धशतक साजरं केलं. तर त्यानंतर आलेल्या सुर्यकुमारने देखील धमाकेदार अंदाजात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यावेळी त्यानं 6 चौकार तर 4 षटकार खेचले.
टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना झिम्बॉब्वेची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर वेसली माधवेरे पहिल्याच बॉलवर बाद झाला. तर रेजिस चकाबवा याला देखील भोपळा फोडता आला नाही. कालांतराने झिम्बॉब्वेची फलंदाजी ढासळत गेली. अखेरच्या 4 षटकात झिम्बॉब्वेला 80 धावांची गरज होती. मात्र, अखेर झिम्बॉब्वेचा 71 धावांनी पराभव झाला आहे.
दरम्यान, सकाळीच टीम इंडियाला सेमीफायनलचं तिकीट मिळालं होतं. त्यामुळे आजचा सामना पहिल्या पोझिशनसाठी महत्त्वाचा होता. आजचा सामना जिंकताच टीम इंडिया पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा पुढील सामना सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध असणार आहे.
Post a Comment