कोरोना काळात उत्कृष्ठ काम; उपसभापती संतोष म्हस्के यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मान



माय नगर वेब टीम 

अहमदनगर -  अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती संतोष म्हस्के यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कोविड काळामध्ये नगर तालुक्यामध्ये बाजार समितीच्या माध्यमातून वाळुंज ता.नगर येथे कोविड सेंटर उभारून त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली. कोविड सेंटर अत्यंत उत्कृष्ट पणे चालवले. बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांच्या कामाची दखल कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने घेतली.

आज अहमदनगर मध्ये माऊली संकुल येथे त्यांना माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी पारनेर बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, रावसाहेब बेद्रे, चंद्रकांत रोखले, संतोष घोरपडे, संतोष गाडे, अजय पवार, शंतनु पांडव, विजय अण्णा धाडगे, जगदीश बैरागी, सचिन सप्रे, सचिन तिवारी  उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post