माय नगर वेब टीम
मुंबई - 'इतकी भिकारXXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ', असे वादग्रस्त वक्तव्य करून कृषिमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आलेत. याप्रकरणी सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा, पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. तर सत्तार यांना राज्यात फिरून देणार नाही, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होताच, अब्दुल सत्तार यांनी कुणाची मने दुखवले असतील, तर सॉरी म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत सत्तारांच्या घरी धडक देत आंदोलन केले.
काय म्हणाले सत्तार?
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची एका वृत्तवाहिनशी बोलताना जीभ घसरली. सत्तार म्हणाले की, 'इतकी भिकारXXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ. ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत. आमचे खोके आणि त्यांचे डोके तपासावे लागेल. ज्यांना खोक्याची आठवण येऊ लागली आहे, त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके - खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो', असे सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना २४ तासांच शब्द मागे घेत माफी मागावी, असा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख यांनी सत्तार यांचे पुतळे महाराष्ट्रभर जाळू, म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे.
सत्तारांनी मागितली माफी
प्रकरण पेटताच सत्तारांनी सॉरी म्हणत मी कोणाबद्दलही काही बोललो नाही. कोणत्याही महिलांची मने दुखावली असे बोललो नाही. कोणाला वाटले असेल, तर मी खेद व्यक्त करतो, म्हणत माफी मागितली. मी फक्त खोक्याबद्दल बोललो. महिलांबद्दल एक शब्दही बोललो नाही. पुढेही बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. सॉरी, असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.
Post a Comment