शिक्षक बँकेला मिळाले नवे कारभारी; विकास मंडळावर 'यांना' मिळाली संधी...

 


अध्यक्षपदी संदीप मोटे, उपाध्यक्ष कैलास सारोक्ते


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर  - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्रीगोंद्याचे संचालक संदीप मोटे यांची तर उपाध्यक्षपदी अकोल्याचे संचालक कैलास सारोक्ते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बँकेच्या सभागृहामध्ये जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. संदीप गोटे यांच्या नावाची  सूचना चोपडे रामेश्वर निवृत्ती यांनी मांडली तर अनुमोदन सरस्वती घुले यांनी दिले तसेच कैलास सारोक्ते यांच्या नावाची सूचना अण्णासाहेब आभाळे यांनी मांडली तर अनुमोदन निर्गुणा बांगर यांनी दिले यावेळी सर्व नूतन संचालक उपस्थित होते.बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.या निवडी प्रसंगी नूतन संचालक सर्वश्री भाऊराव राहींज, महिंद्र भणभने, सूर्यकांत काळे ,शशिकांत जेजुरकर ,योगेश वाघमारे, बाळू सरोदे ,संतोष कुमार राऊत, कल्याण लवांडे, गोरक्षनाथ विटनोर, रमेश गोरे, बाळासाहेब तापकीर, माणिक कदम ,शिवाजी कराड, कारभारी बाबर व ज्ञानेश्वर शिरसाट उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी आठ वाजता गुरुमाऊली मंडळाच्या कोअर कमिटीची सभा झाली त्यात मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते सर्व संचालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यानंतर विचार विनिमय करून सर्वानुमते या निवडी निश्चित करण्यात आल्या.

गुरुमाऊली मंडळाचे नेते बापूसाहेब तांबे मंडळाचे अध्यक्ष राजकुमार साळवे, राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट, कोअर कमिटीचे पदाधिकारी सर्वश्री गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, विद्युलता आढाव, विठ्ठल फुंदे, साहेबराव अनाप, सलीमखान पठाण,संतोष दुसुंगे, बाबा खरात, शरद सुद्रिक, किसन खेमनर, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाठ,सुयोग पवार, मित्र पक्षांचे बाळासाहेब कदम, दिनेश खोसे, मुकेश गडदे, राजेंद्र विधाते, शरद वांडेकर, प्रवीण शेरकर, मीनाक्षी अवचरे, राजू राहणे, सत्यवान मेहरे आदींची सकाळी बैठक होऊन त्यामध्ये संचालक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर नूतन संचालकांशी चर्चा झाली.जिल्हा भरातील कार्यकर्त्यांची आमसभा त्याच वेळी बँकेच्या भा दा पाटील गुरुजी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. तेथे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या . सर्वांच्या विचार विनिमयातून एकमताने नूतन पदाधिकाऱ्यांच्या या निवडी करण्यात आल्या.नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगावचे विश्वस्त विलास गवळी, उपाध्यक्षपदी संगमनेरचे विश्वस्त संजय शेंडगे, खजिनदारपदी पाथर्डीच्या विश्वस्त सुवर्णा राठोड तर सचिवपदी नेवासाचे विश्वस्त संतोष मगर यांची निवड घोषित करण्यात आली.विकास मंडळाचे निवडणूक निर्णय अधिकारी अँडवोकेट देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. त्यांना विकास मंडळाचे व्यवस्थापक सुरेंद्र आढाव यांनी सहकार्य केले.

निवडी झाल्यानंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना बँकेचे नूतन चेअरमन संदीप मोटे व विकास मंडळाचे नूतन अध्यक्ष विलास गवळी यांनीजिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने चांगले काम करू असे आश्वासन दिले.

सूत्रसंचालन माजी चेअरमन साहेबराव अनाप यांनी केले. शेवटी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल फुंदे यांनी आभार मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post