माय नगर वेब टीम
अहमदनगर - उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या दिलेल्या निर्णयाला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान दिले होते.
याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नेमणूक करू नये, असे सक्त निर्देश दिले आहेत. ॲड. विद्यासागर शिंदे यांनी ही माहिती दिली.
Post a Comment