सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द; सरपंच प्रियंका लामखडे झाल्या आक्रमक...



मंत्री अब्दुल सत्तार यांचा निंबळक सरपंचाच्या वतीने जाहीर निषेध 

जिल्ह्यात फिरकू देणार नाही ; सरकारकडून शेतकऱ्यांचीही हेळसांड

माय नगर वेब टीम

नगर तालुका- मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

      मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलेबद्दल बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे. आज संपूर्ण राज्यात सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांमध्ये आदराचे स्थान आहे. मंत्री सत्तार यांनी जाहीर माफी मागावी तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा सत्तार यांना जिल्ह्यात फिरकू दिले जाणार नाही. असा इशारा प्रियंका लामखडे यांनी दिला आहे.




      यावेळी प्रियंका लामखडे यांनी बोलताना सरकारवर कडाडून टीका केली. सरकार हे जनमताचे नसून पन्नास खोक्याचे सरकार आहे. त्यांना जनतेचे, शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. राज्यात अतिवृष्टी झाली असताना ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे होते. परंतु फक्त पंचनाम्याचा फक्त फार्स सुरू केला आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. 

    अशा या सरकारचा व मंत्री सत्तार यांचा निषेध करण्यात येत आहे. यापुढे सत्तार यांना जिल्ह्यात फिरकू देणार नाही. आघाडी सरकारने विकासाचे घेतलेले निर्णय रद्द करण्याचा एकमेव धडाका या सरकारने चालवला आहे. यापूर्वी सरकारने घेतलेले विकासात्मक शेतकरी हिताचे निर्णय रद्द करणे हा उद्योग सरकारचा सुरू आहे. फक्त आश्वासने देण्यात सरकार व सरकारचे मंत्री व्यस्त आहेत. प्रत्यक्षात काहीही कामे होत नाहीत. त्यामुळे सरकार बद्दल नागरिकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे. अशी टीका देखील सरपंच लामखडे यांनी केली.

     मंत्रीपदावर असणाऱ्या नेत्याने महिलेबद्दल बोलताना भान ठेवणे गरजेचे असताना त्यांच्या डोक्यात फक्त सत्तेची हवा गेल्याचे दिसून येत आहे. तरी अब्दुल सत्तार यांनी राजीनामा देण्याची मागणी प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे. वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्यात येईल. मंत्री सत्तार यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. एका महिला खासदारांबद्दल बोलताना आपण काय बोलत आहोत याचे भान ठेवणे गरजेचे होते. यापुढे त्यांना जिल्ह्यात फिरकू देण्यात येणार नाही.

.....सौ.प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post