कैलास आव्हाड यांची राज्यकर निरीक्षक पदी निवड

माय अहमदनगर वेब टीम



 नगर तालुका- नगर तालुक्यातील पांगरमल गावचे रहिवासी कैलास विठ्ठल आव्हाड यांची राज्यकर निरीक्षक पदावर निवड झाली आहे.

     कैलास आव्हाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत यश मिळविले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पांगरमल येथे तर माध्यमिक शिक्षण मिरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात झाले होते. त्यांच्या  निवडीबद्दल पांगरमल सरपंच बापूसाहेब आव्हाड व देविदास आव्हाड यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

     यावेळी बोलताना सरपंच बापूसाहेब आव्हाड यांनी सांगितले की, ग्रामीण भागात शिक्षणासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध नसतात. तरीदेखील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे नाही हे कैलास आव्हाड यांनी दाखवून दिले आहे. कैलास आव्हाड यांनी पांगरमल गावचे नाव राज्यात पोहोचविले आहे. आजच्या तरुण पिढीने कैलास आव्हाड यांचा आदर्श घेण्याचे आवाहन सरपंच बापूसाहेब आव्हाड, देविदास आव्हाड यांनी केले आहे.

__________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post