माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका (शशिकांत पवार) - अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्रामार्फत नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य खुली मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये यशश्री अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचे यश मिळविले असून बारा विद्यार्थ्यांनी विविध पदके प्राप्त केली आहेत.
ऋतुजा शरद कदम (सुवर्ण पदक ) अनुष्का सचिन चोरदीय (सुवर्ण पदक) स्वरा संतोष कदम (रोप्य पदक) अंजिली शरद कदम (रोप्य पदक) कल्याणी महेश शिंदे (कास्य पदक) शाहिद अफजल शेख (रोप्य पदक) चेतन नितीन दायमा (रोप्य पदक) अक्षत हार्दिक शहा (रोप्य पदक) अमन सिकंदर सय्यद (कास्य पदक) राजवर्धन राम गुंड (कास्य पदक) प्रत्युश पंकज लोढा (कास्य पदक) ऋतुराज वसंत कारंडे (कास्य पदक) या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये यश संपादन करून पदके मिळविली.
या विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार तसेच क्रीडा शिक्षक ऋषिकेश घोडेकर, सायली कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना राजेंद्र पवार यांनी सांगितले की यशश्री अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचे महत्व पटवून दिले जाते. विद्यार्थ्यांची आवड पाहून त्यांना त्या खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रोत्साहन तसेच प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळेच यशश्री अकॅडमी मधील विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळात देखील प्राविण्य मिळवत आहेत.
यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन शाळेच्या संचालिका अनुरिता शर्मा, सचिव गणेश शर्मा, यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा, प्राचार्य सिरील पंडित, उपप्राचार्या अरूषा कोल्हटकर यांच्यासह इतर शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
_________________________________
यशश्री अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणच नव्हे तर खेळ तसेच आयुष्यात उत्तम जीवन जगण्याबाबत संस्कार घडविले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळातही प्रावीण्य मिळवून आपले करिअर घडवू शकतात याची जाणीव करून दिली जाते. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे अभिमानास्पद आहे.
.....सौ.अनुरीता शर्मा ( संचालिका, यशश्री अकॅडमी)
________________________
सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडविणे हा यशश्री अकॅडमीचा मुख्य उद्देश आहे. शिस्त, संस्कार आणि अभ्यास या गोष्टींवर भर देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणे हे शिक्षकांच्या हातात असल्याने त्याची जाणीव ठेवूनच सर्व शिक्षक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देतात. पालकही यशश्री अकॅडमीच्या व्यवस्थापन व शिक्षकांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांना पाठवत असतात. त्यांच्या विश्वासात तडा जाऊ न देण्याचे कर्तव्य पार पाडण्याचे कार्य यशश्री अकॅडमीच्या वतीने अविरतपणे सुरू आहे.
....... राजेंद्र पवार (शिक्षक)
_______________________________
Post a Comment