दूषित पाणी हेच आजाराचे मुख्य कारण- सरपंच प्रियंका लामखडे

 माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका- दूषित पाणी हेच आजाराचे मुख्य कारण आहे. दूषित पाण्यामुळे विविध आजार उद्भवत असतात. त्यामुळे नागरिकांनी पाण्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन निंबळक सरपंच प्रियंका लामखडे यांनी केले आहे.

     निंबळक येथील माळवाडी शाळेच्या प्रांगणात आर. ओ. प्लॅंट बसविण्यात आला आहे. तिथे ग्रामपंचायतच्या वतीने शेड, मोटर, लाईट व पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याप्रसंगी बोलताना सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी सांगितले की, दूषित पाणी विविध आजारांना निमंत्रण देतात. सर्वाधिक आजार हे पाण्यामुळेच उद्भवत असून सर्व नागरिकांनी पाण्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.



      माळवाडी शाळेच्या प्रांगणात आर.ओ. प्लॅंट बसविण्यात आल्याने येथील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळणार असल्याची माहिती देखील सरपंच सौ. लामखडे यांनी दिली.

       याप्रसंगी अशोक कळसे, तोफिक पटेल, सुदाम कोतकर, दत्तात्रय चोथे, मच्छिंद्र भोर, सुरेश होळकर, रामदास होळकर, राजाराम होळकर, व्यवहारे सर, चितळकर सर, लक्ष्मण चोथे, शंकर पांडगे, गावडे, गणेश कोतकर, रंगनाथ कोतकर यांच्यासह माळवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post