माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील पांगरमल ग्रामपंचायत निवडणुकीत काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनलने प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
पांगरमल हे गाव नसून माझ्यासाठी एक कुटुंबच आहे. गावातील प्रत्येक नागरिक हा माझ्यासाठी कुटुंबातील सदस्य असून तीच वृत्ती ठेवून मी सरपंच पदाच्या काळात गाव विकास व सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केलेले आहे. गावात केलेले विकास कामे सर्वसामान्य, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण व इतर विकास कामांमुळे सर्वसामान्य जनता आमच्या पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
पांगरमल ग्रामस्थांनी आजपर्यंत माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी कदापि तडा जाऊ दिला नाही अन् यापुढे देखील जाऊ देणार नाही. पांगरमल ग्रामस्थांचे माझ्यावर खूप मोठे ऋण आहे त्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्यासाठी मला गावातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करावयाचे आहे. तरी देखील ग्रामस्थांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही. सर्वसामान्य जनता आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील होतो आणि यापुढे राहणार असल्याचे सरपंच आव्हाड यांनी सांगितले.
काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांची प्रचार फेरी काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, तरुण, महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सरपंच आव्हाड यांनी पांगरमल गावाला मी कुटुंब समजून कार्य करत आलो आहे. विकास कामात राजकारण न करता फक्त गाव व ग्रामस्थांच्या हिताचा विचार केला. नागरिकांचे कामे करताना विरोधक असो किंवा इतर असा विचार न करता कामे केलेली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज अबालवृद्ध आमच्या पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. विरोधकांनी कितीही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी पांगरमलचे मतदार सुज्ञ असून त्यांना सत्यता माहिती आहे. पांगरमल गावाला आदर्श गाव बनविण्याचा मानस असून त्यादृष्टीने आपली वाटचाल सुरू असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
_______________________________________---
विकास कामे हेच आमचे भांडवल
सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांचे निराकरण आणि गावात केलेली विकास कामे हेच आमचे भांडवल आहे. तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे कार्य आम्ही केले आणि यापुढेही पांगरमल ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठीच आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचे काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी सांगितले.
_____________________________________________
Post a Comment