माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका (शशिकांत पवार) - विद्यार्थ्यांना बालवयातच संस्कृती जोपासण्याबाबत शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यशश्री अकॅडमीच्या संचालिका अनुरीता शर्मा यांनी केले.
नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री प्री-स्कूल मध्ये 'ख्रिसमस सेलिब्रेशन' व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना सौ. अनुरीता शर्मा यांनी सांगितले की, आपल्या देशाची संस्कृती जगात महान आहे. संस्कृती जोपासण्याचे शिक्षण बालवयातच विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव देशात दिसून येत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून पिढी बरबाद होत आहे. त्यासाठी आपल्या संस्कृतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना बालवयातच दिल्याने संस्कृतीचे जतन होणार आहे. आपले सर्व सण, उत्सव मोठ्या आनंदाने साजरे केले पाहिजेत, असेही शर्मा यांनी सांगितले.
यावेळी यशश्री प्री-स्कूलच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कलाकृती, नृत्य, खेळांच्या स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासा साठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध नवनवीन उपक्रमांची माहिती प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी दिली.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षिका राजश्री तोडमल, दीपा पवार, दिपाली बनकर, वेदिका मगर, अंजली धनवळे उपस्थित होत्या.
___________________________________
विद्यार्थी शाळेत सर्व धर्म समभाव या वृत्तीने वर्तवणूक करत असतात. बालवयात विद्यार्थी सर्व सण उत्सव एकत्रित साजरे करून एकीची भावना जोपासतात. त्यामुळे विद्यालयात सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करून विद्यार्थ्यांमध्ये समानतेची, एकीची भावना निर्माण केली जाते.
.......सौ. मनीषा पवार ( प्राचार्या, यशस्वी प्री-स्कूल जेऊर)
____________________
नूतन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात......
यशश्री अकॅडमी प्री- स्कूल सावेडी व प्री-स्कूल जेऊर येथील नवीन वर्षाचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. यशश्री स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे यशश्री अकॅडमीतील सर्व विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच, विविध खेळात प्राविण्य मिळवत आहेत.त्यामुळे नगर तालुक्यात यशश्री अकॅडमीचे नाव लौकिकास आले असून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पालक यशश्री अकॅडमीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
______________________________
यशश्री अकॅडमी मध्ये सर्व शिक्षक हे उच्चशिक्षित असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. विद्यार्थ्यांच्या हिताकरता नेहमीच नवनवीन उपक्रम राबविले जातात. यशश्री अकॅडमीच्या संचालिका सौ. अनुरिता शर्मा तसेच यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच, सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे यशश्री अकॅडमी मध्ये ॲडमिशन मिळविण्यासाठी बहुतेक जण प्रयत्न करताना दिसून येतात.
________________________
Post a Comment