नगर औरंगाबाद महामार्ग ; अपघातांची वाढती संख्या इंद्रायणी चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी



नगर तालुका (शशिकांत पवार) - नगर औरंगाबाद रोड वर इंद्रायणी हाॕटेल समोरील चौकात गतीरोधक बसवण्याची मागणी तपोवन रोड परिसरातील नागरीकांनी कार्यकारी अभियंता जागतीक बॕक प्रकल्प विभाग अहमदनगर व उपअभियंता जागतिक बॕक प्रकल्प विभाग क्र. २ अहमदनगर यांचेकडे निवेदन देऊन केली आहे. त्याची प्रत माजी आमदार शिवाजीराव कर्डीले


यांनाही देण्यात आली. कर्डिले यांच्याशी येथे वारंवार घडणारे अपघात व वाढती वर्दळ पाहता गतीरोधक बसविण्याची गरज असल्याचे नागरीकांनी सांगितले.

      इंद्रायणी चौकात इंद्रायणी हाॕटेल समोर तपोवन परीसरातुन येणा-या जाणा-या नागरीकांची संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे. अल्पावधीतच इंद्रायणी बस स्टाॕप निर्माण झाला असून तपोवन वासीयांना नगर मध्ये जाण्या येण्यासाठी हा रोड सोईस्कर आहे. तसेच या चौकात हाॕटेल व्यवसाय जोरात असून याच चौकात तीन मंगल कार्यालय, मार्बल स्टाईलचे व्यवसायीक असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. 

       तपोवन परीसर मोठ्या प्रमाणात विकसीत होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शाळकरी मुले, भाजीपाला व्यवसायीक, बांधकाम व्यवसायीक जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या प्रमाणावर या चौकाचा वापर करीत आहेत. याच रोड वर नको त्या ठीकाणी गतीरोधक आहेत पाहीजे त्या ठीकाणी गतीरोधक नाहीत. असा आरोप येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

       इंद्रायणी  चौकात गतीरोधक बसवावेत या आशयाचे निवेदन परीसरातील नागरीकांनी संबंधित विभागाला दिले आहे. निवेदनावर संदिप पालवे, दत्तू शिरसाठ,अशोक काळे,लक्ष्मण काळे,स्वप्निल कासवा, एस.रहेमान खान, संदिप कीनगे, विक्रम आव्हाड, संतोष लोंढे, सोमनाथ नजन, गोरक्षनाथ दरवडे, रविंद्र कैदके,आसाराम लाहोटी, भगवान आव्हाड यांच्या सह परिसरातील नागरीकांच्या सह्या आहेत.

______________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post