जिल्हा मोटार वायडिंग संघटनेच्या अध्यक्षपदी विठ्ठल दळवी यांची निवड

 


सचिवपदी शिवाजी दारकुंडे तर शशी आंबेकर खजिनदार । अहमदनगर जिल्हा मोटार वायडिंग संघटनेची स्थापना

माय अहमदनगर वेब टीम -

अहमदनगर जिल्हा मोटार वायडिंग संघटनेच्या अध्यक्षपदी विठ्ठल इलेक्ट्रीकलचे संचालक विठ्ठल दळवी यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब बोरुडे, सचिवपदी शिवाजी दारकुंडे, खजिनदारपदी शशी आंबेकर, सहसचिवपदी आठरे यांची निवड करण्यात आली.

अहमदनगर जिल्हा मोटार वायडिंग संघटनेची बैठक नुकतीच नगरमध्ये पार पडली. या बैठकीला जिल्हाभरातील वायडिंग करणारे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वायडिंग करणार्‍या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना स्थापन करावी असा ठराव मांडण्यात आला. त्यानुसार जिल्हा मोटार वायडिंग संघटनेची स्थापना करण्यात आली. तसेच संघटनेच्या माध्यमातून वायडिंग करणार्‍या प्रतिनिधीचा विमा उतरविला जाणार असल्याचे ठरले.

अहमदनगर जिल्हा मोटार वायडिंग संघटेचे पदाधिकारी ः अध्यक्ष- विठ्ठल दळवी, उपाध्यक्ष- बाबासाहेब बोरुडे, सचिव- शिवाजी दारकुंडे, खजिनदार - शशी आंबेकर, सहसचिव- आठरे, संचालक - अमोल कवडे, रघुनाथ चोभे, माने, सुनिल खोमणे, सुनिल ठाणगे, राजू गव्हाणे, दत्ता ठोकरे, गोरक्षनाथ विधाते, नंदू दरेकर यांची निवड करण्यात आली. जिल्हा मोटार वायडिंग संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे जिल्हाभरातून अभिंनदन केले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post