हर्ष घाडगे याची बुद्धिबळ खेळासाठी राज्य पातळीवर निवड यशश्री अकॅडमीचा विद्यार्थी ; क्रिडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमीचा विद्यार्थी हर्ष दत्ता घाडगे याची बुद्धिबळ खेळासाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.

      यशश्री अकॅडमीतील विद्यार्थी अभ्यासाबरोबर खेळात विशेष प्राविण्य मिळवत असल्याचे नेहमीच दिसून आलेले आहे. यापूर्वी सी. बी. एस. सी. नॅशनल चॅम्पियनशिप 2022- 23 या स्पर्धेमध्ये एरोबिक्स खेळामध्ये दिव्या किर्तीकुमार कोठारी या विद्यार्थिनींनी ब्रांझ पथक मिळविले होते. या स्पर्धा शिर्डी येथे संजीवनी इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडल्या होत्या.

     हर्ष धाडगे हा विद्यार्थी यशश्री अकॅडमीत इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत आहे. अकॅडमीचे क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हर्ष घाडगे याची बुद्धिबळ खेळासाठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.

     हर्ष घाडगे व त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांचा सत्कार संचालिका अनुरिता शर्मा, यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा, उपप्राचार्या आरुषा कोल्हटकर यांच्यासह अकॅडमीतील शिक्षकांच्या वतीने करण्यात आला.

__________________

 'खेळ' हा जीवनातील अविभाज्य घटक 

यशश्री अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर खेळाकडे ही विशेष लक्ष दिले जाते. 'आरोग्य हीच धनसंपदा' असल्यामुळे खेळ हे जीवनातील अविभाज्य घटक आहेत. अनुभवी क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळात विशेष प्राविण्य मिळवत आपल्या पालकांचे व अकॅडमीचे नाव मोठे केले आहे.

..... यश शर्मा (अध्यक्ष यश क्रिएटिव्ह)

______________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post