माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका (शशिकांत पवार)- विद्यार्थ्यांनी मैदानावर येणे गरजेचे असून मैदानी खेळाचे अनेक फायदे आहेत. मैदानी खेळात विद्यार्थ्यांनी नगरचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
'पावर हाऊस फिटनेस अँड फन क्लब' च्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सावेडी येथील यशश्री स्कूलच्या मैदानावर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. अरुणोदय प्रशिक्षण केंद्राअंतर्गत सावेडी येथे विविध खेळांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश शर्मा, संचालिका अनुरिता शर्मा, यश शर्मा, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र पवार, जेऊर प्री- स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, शैलेश गवळी, अमित खामकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी सांगितले की, मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांनी मैदानावर येणे गरजेचे आहे. मैदानी खेळाचे अनेक फायदे असून मैदानी खेळ खेळून विद्यार्थ्यांनी नगरचे नाव उज्वल करावे. मैदानावर आल्यानंतर बालपणीच विद्यार्थी कोणता खेळ चांगला खेळतो हे प्रशिक्षक ठरवतात व त्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी असते. यशश्री अकॅडमी मधील अनेक खेळाडू राज्य पातळीवर तसेच मिनी ऑलंपिक मध्ये खेळले आहेत. ही नगरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
नगरच्या मातीतील खेळाडूंनी राज्य, देश तसेच ऑलिंपिक मध्ये खेळून नाव कमवावे. यशश्री अकॅडमीने अभ्यास व शिस्तबद्धता म्हणून नावलौकिक मिळविलेलाच आहे. तसेच खेळातही अनेक विद्यार्थी चमकले आहेत. मैदानी खेळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याने नगरकरांनी प्रशिक्षण केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहनही आमदार जगताप यांनी केले.
प्रशिक्षण केंद्रांतर्गत मनोरंजनात्मक खेळ, फिजिकल फिटनेस, स्व-संरक्षण, अँथलेटीक्स, लाठीकाठी, तलवारबाजी, मैदानी खेळ, एरोबिक्स अशा विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थिनींसाठी महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे, मुख्याध्यापिका पराग अग्रवाल, राष्ट्रीय खेळाडू सीमा लाड, अरुणोदय क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे संचालक महेश आनंदकर, सुधीर आनंदकर, मयूर कुलथे, निलेश हिंगे, अंकुश चत्तर, सुहास शिरसाठ, प्रशिक्षक ऋषिकेश घोडेकर, स्नेहल धस, सायली कांबळे, त्रिशा चंगेडिया, अथर्व पिपाडा, पंपीता बिस्वास यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहादाब सय्यद यांनी केले.
__________________________________
मैदानी खेळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नगर शहर तसेच शहरालगत असणा-या गावांनी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेळामध्ये देखील विद्यार्थ्यांचे करीअर घडु शकते. या संधीचा लाभ घ्यावा.
..... राजेंद्र पवार (क्रिडा मार्गदर्शक)
____________________
Post a Comment