- का लागत नाही निवडणुक प्रक्रिया? / कोण आहे याला जबाबदार
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावच्या सरपंच- उपसपंच पदाच्या निवडणुकीकडे प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येत आहे. सरपंचाने राजीनामा देऊन तब्बल एक महिना पूर्ण होत असूनही प्रशासन मात्र निवडणुक जाहीर करत नसल्याने प्रशासकावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गावचे सरपंच मनोज कोकाटे आणि उपसरपंच कल्पना ठोंबरे यांनी राजीनामे देऊन जवळपास एक महिना होत आहे. कोकाटे यांनी १९ नोहेंबर २०२२ रोजी राजीनामा दिला. तो २९ डिसेंबरला ग्रामपंचायतच्या मासिक सभेत पडताळणी करून मंजूर करण्यात आला. त्यानंतर नगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविला . त्या संदर्भातील सर्व कागदपत्रं पडताळून तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर राजीनाम्या बाबत ५ जानेवारी २०२३ पर्यंत ७ दिवस हरकती ठेवण्यात आल्या होत्या, सरपंचाने व गावातून त्यास कोणीही हरकत न घेतल्याने राजीनामा कायद्याला धरून मंजूर करून ग्रामपंचयत मधील सरपंच पद हे रिक्त करण्यात आले.
त्यानंतर दोन दिवसात कार्यवाही करून लगेच नव्याने सरपंच पदाची निवडणुक प्रशासनाने लावणे आवश्यक आहे.
आज १4 जानेवारी तारीख असून अद्यापही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला दिसत नाही. गावातील अनेक ग्रामस्थांनी निवडणुक जाहीर करण्याची मागणी केली, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. प्रशासक कोणते कारण पुढे करत निवडणुक ढकलत आहे हा आता चर्चेचा विषय बनला आहे. २६ जानेवारी जवळ आलेली झेंडा कोण फडकवणार याची पंचक्रोशीत झालेली आहे,
नेहमी तत्पर असलेले निवडणुक विभाग आता कासवाच्या गतीने ही प्रक्रिया का राबवत आहे, अशी चर्चा गावत झडत असुन आता प्रशासन याबाबात किती दिवस डोळे झाक करणार हा गावासाठी चिंतनाचा विषय बनला आहे.
Post a Comment