सावित्रीबाईंनी स्त्रियांना रूढी परंपरेतून मुक्त केले -सौ. मनीषा पवार

 माय अहमदनगर वेब टीम 



 नगर तालुका (शशिकांत पवार)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना रूढी परंपरेचा पिंजरा तोडून मुक्त केले असल्याचे प्रतिपादन यशश्री प्री-स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी केले.

      सावित्रीबाई फुले यांची जयंती जेऊर येथील यशश्री प्री-स्कूल मध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना प्राचार्या सौ. मनीषा पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सावित्रीबाईंनी मुलींना शिक्षण देऊन अनिष्ट रूढी परंपरे विरुद्ध आवाज उठविला. अनिष्ट रूढी परंपरे मुळे मुलींना शिक्षणासाठी  बंदी होती. तरी सावित्रीबाईंनी न डगमगता मुलींसाठी शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. त्यामुळेच आज महिला अनिष्ट रुढी परंपरेतून मुक्त झाल्या असल्याचे  सौ.पवार यांनी सांगितले.

       सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी शिक्षिका राजश्री तोडमल, दीपा पवार, दिपाली बनकर, वेदिका मगर, अंजली धनवळे उपस्थित होत्या.

सावित्रीबाई फुले जयंती यशश्री अकॅडमीचे वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत असते. त्याच पार्श्वभूमीवर यशश्री अकॅडमीच्या वतीने संचालिका अनुरिता शर्मा, यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य व शिक्षकांच्या सहकार्याने धनगरवाडी, प्री-स्कूल सावेडी, प्री- स्कूल जेऊर येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. 

      _________________________________



आजच्या युगात महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. समाज भरकटत चालला असून महापुरुषांचे विचार आचरणात आणल्याने स्वतःबरोबर समाजाची देखील प्रगती होत असते. आपल्या देशातील महापुरुषांनी आजच्या पिढीसमोर मोठा आदर्श ठेवलेला आहे. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य केल्यास निश्चितच देशाचे उज्वल भवितव्य घडेल.

..... सौ अनुरीता शर्मा (संचालिका यशश्री अकॅडमी)

__________________________'___'_

यशश्री अकॅडमी मध्ये बाल वयातच विद्यार्थ्यांना आपल्या देशातील महापुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी. यासाठी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साज-या केल्या जातात. त्याप्रसंगी महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

....सौ. मनीषा पवार (प्राचार्या, यशश्री प्री-स्कूल जेऊर)

______________________


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post