महिला सशक्तिकरण ही काळाची गरज- सौ. राजश्री राउळ यशश्री अकॅडमी मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

 माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका (शशिकांत पवार)- आजच्या काळात महिला सशक्तीकरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशश्री अकॅडमीच्या शिक्षीका सौ. राजश्री राउळ यांनी केले आहे.

     २४ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून भारत देशात साजरा केला जातो. यशश्री अकॅडमी मध्ये संचालिका सौ.अनुरीता शर्मा, उपप्राचार्या अरुषा कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षीका सौ. राजश्री राउळ यांच्या पुढाकारातून बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



      याप्रसंगी सौ. राजश्री राउळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महिला सशक्तिकरण होणे काळाची गरज आहे. काही भागात आजही अनिष्ट रूढी, परंपरा चालू आहेत. स्री भ्रुण हत्या, हुंडा, घरगुती छळ थांबविण्यासाठी महिलांनी ही लढले पाहिजे. महिलांचे सशक्तिकरण म्हणजे महिलांचा संपूर्ण विकास होय. देशाला सक्षम व महासत्ता बनविण्यासाठी महिला ह्या आर्थिक, सामाजिक व मानसिक दृष्ट्या स्वतंत्र असल्या पाहिजेत असेही सौ.राउळ यांनी सांगितले. 

     यशश्री अकॅडमी मध्ये बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार दाखवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

_______________________________



 स्त्री जन्मा तेरी यही कहानी,

आचल मे दूध और आखो में पाणी!

....समाजातील ही व्यवस्था बदलण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिला सक्षम झाल्या तर देश सक्षम होईल व सर्व समाजाची उन्नती होईल. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे.

 .....सौ अनुरीता शर्मा (संचालिका यशश्री अकॅडमी)

_______________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post