माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर येथील शिवांश शर्मा या चिमुकल्याने हॉर्स रायडिंग राज्यस्तरीय स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
जॅपलुप हॉर्स रायडिंग स्कूल तळेगाव येथे राज्यस्तरीय हॉर्स रायडिंग स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नगर येथील राजस्व हॉर्स रायडिंग स्कूल तसेच यशश्री अकॅडमी मधील अकरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांचा मुलगा शिवांश शर्मा (वय ५) याने रीन इक्विटेशन (लगाम समानता) स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक मिळवला आहे. सर्वात कमी वयाचा म्हणून शिवांश शर्मा याची हॉर्स रायडिंग स्पर्धेत नोंद घेतली गेली. यशश्री अकॅडमी मधील शिवांश शर्मा व विराज पारखे या दोन विद्यार्थ्यांनी हॉर्स रायडिंग स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
विजय जाधव याने ट्रॉट स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले. प्रसाद भणगे यांनी ड्रसाज स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला तर शो जम्पिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. मनाली जासूद हिने शो जम्पिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये अहमद शेख, यशनीत दळवी, भारती शेवते, रेहा पोखरणा, आदिती डोंगरे, विठ्ठल जीगे, विराज पारखे यांनीही सहभाग नोंदवून उत्तम कामगिरी केली.
हॉर्स रायडिंग स्पर्धा तीन प्रकारांमध्ये पार पडल्या. चिल्ड्रन, ज्युनिअर तसेच ओपन या प्रकारांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक राजीव कानडे, सुशांत तरवडे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संचालिका अनुरीता शर्मा, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र पवार, प्राचार्या सौ. मनीषा पवार, प्राचार्या तानिया वाधवाणी, उपप्राचार्य अरुषा कोल्हटकर यांच्यासह सर्वांनी कौतुक केले आहे.