माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावचे माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले आहे.
घनश्याम म्हस्के यांची अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल आ. निलेश लंके यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी बोलताना आ. लंके यांनी घनश्याम म्हस्के यांच्या कार्याचे कौतुक केले. म्हस्के नेहमीच सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी निंबळक गावच्या माजी उपसरपंच पदाची तसेच विद्यमान सोसायटी सदस्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेने त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. म्हस्के निश्चितच त्या पदाला न्याय देऊन सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करतील असेही आ. लंके यांनी सांगितले. याप्रसंगी युवा नेते अजय लामखडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे, तोफिक पटेल उपस्थित होते.
_______________
अखिल विश्व परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेला घनश्याम म्हस्के यांच्या रूपाने कर्तृत्ववान नेतृत्व मिळाले आहे. म्हस्के हे संघटनेच्या माध्यमातून धार्मिक कार्य व त्यासाठी येणाऱ्या समस्यांवर निश्चितच मात करतील.
....अजय लामखडे (युवा नेते)
__________________
Post a Comment