शिक्षण क्षेत्रात नावाजलेली यशश्री अकॅडमी यशश्री अकॅडमी मध्ये सुरू असलेल्या चालू घडामोडी

माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका-   यशश्री  अकॅडमीत विद्यार्थ्यांचा इन्व्हेस्टिचर सेरेमनी शिस्तबद्धतेत संपन्न. यशश्री अकॅडमी धनगरवाडी येथे 2023- 24 च्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला. या शैक्षणिक वर्षासाठी हेड बॉय कौशिक कीर्तने व हेड गर्ल म्हणून कुमारी श्रेया मुरतुडकर यांनी शपथ ग्रहण केली. 2022- 23 च्या होल्डर्सनी विद्यार्थी आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी प्राचार्यांना विद्यालयाचा ध्वज सुपूर्त करून असिस्टंट हाऊस कॅप्टन आणि स्पोर्ट्स कॅप्टन यांना ध्वज हस्तांतरित करण्यात आला.

       यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धतेची आणि जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडण्याची शपथ घेतली. चालू वर्षासाठी 89 विद्यार्थ्यांनी या समारंभात पदग्रहण केले. या कार्यक्रमांमध्ये कल्चरल कमिटीनेही पदग्रहण केले. शिस्तबद्ध संचलनाने कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवली. याप्रसंगी विद्यालयाचे सर्व मान्यवर उपस्थित होते.

___________________

      धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या वेळी आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. शाळेतील सुरुवातीपासून दहावीपर्यंतचा प्रवास व इतर आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आपली मते व्यक्त केली. 

       विद्यार्थ्यांना परीक्षेचे पेपर सोडवण्यासंबंधीचे सर्व मार्गदर्शन शिक्षकांनी व वरिष्ठांनी केले. तसेच सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देताना आई-वडील पालक यांनी आपली उपस्थिती दर्शवली. आई-वडिलांचे तोंड गोड करून त्यांनी आपल्या मुलांचे हॉल तिकीट हस्तांतरित केले. अशा प्रकारे अतिशय सुशोभित असा हा कार्यक्रम पार पडला

___________________

यशश्री अकॅडमीची प्रवेश प्रक्रिया चालू झाली असून पालकांनी आपला प्रवेश निश्चित करावा

प्रवेशासाठी संपर्क-

१) धनगरवाडी ऑफिस

राजू पवार सर - ९८२२७५६१८२

आरुषा कोल्हटकर

२) सावेडी ऑफिस

प्रज्ञा जोशी-  ८४११८२००१७

* ऑफिस वेळ ९ ते १

______________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post