माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील बहिरवाडी गावच्या सरपंच सौ. अंजना येवले यांना राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान 2023 जाहीर झाला आहे.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान 2023 पुरस्कार सौ. अंजना येवले यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल -आठल्ये यांच्या हस्ते बुधवार दिनांक 8 मार्च रोजी देण्यात येणार आहे.
बहिरवाडी सारख्या छोट्या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. कोरोनाच्या काळात सरपंच अंजना येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्य करून जेऊर गटात प्रथम कोरोना मुक्त गाव करण्याचा बहुमान बहिरवाडी गावाने मिळवला होता. तसेच गाव विकासासाठी गट तट विसरून सौ.येवले नेहमीच पुढाकार घेतात.
शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्या अग्रेसर असतात. तसेच गाव हितासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांचे विविध स्तरांमधून कौतुक होत आहे.
____________________________'___
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव विकासासाठी प्रयत्न करत आहे. मला मिळालेला सन्मान हा माझा नसून संपूर्ण बहिरवाडी ग्रामस्थांचा आहे.
..... सौ. अंजना संजय येवले (सरपंच बहिरवाडी)
_____________________________
Post a Comment