कुस्तीत मिळालेले सुवर्णपदक डॉ. संदीप कळमकर यांची देण पायावर मोफत शस्त्रक्रिया ; पै. आतिश तोडकर

 माय अहमदनगर वेब टीम


नगर तालुका( शशिकांत पवार) - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मला मिळालेले सुवर्णपदक डॉ. संदीप कळमकर यांचीच देण असल्याचे प्रतिपादन पैलवान आतिश तोडकर यांनी केले.

     अतिश तोडकर याने ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील ५७ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले आहे. वडील सुनील तोडकर यांनी जमीन विकून मुलगा अतिशला कुस्तीसाठी प्रोत्साहित केले होते. अतीश तोडकर याने पहिल्या स्पर्धेत कांस्य, दुसऱ्या स्पर्धेत रौप्य तर तिसऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तो आतापर्यंत १६ राष्ट्रीय स्पर्धा खेळला असून तीन सुवर्णपदकांसह आठ पदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मल्लांना हरवून त्याने कुस्ती खेळात आपला वेगळाच ठसा निर्माण केला आहे. आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्याचे  ध्येय अतिशचे आहे.

       गरिबीची परिस्थिती असताना अपघातात अतिशचा पाय फ्रॅक्चर झाला होता. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचवेळी डॉ. संदीप कळमकर यांना अतिश उत्तम कुस्तीपटू असल्याचे समजले. अन् त्यांनी अतिश याच्या पायावर मोफत शस्त्रक्रिया केली. त्यामुळे डॉ. संदीप कळमकर यांच्यामुळेच मी कुस्ती  खेळत असून मला मिळालेले सुवर्णपदक हे डॉ. कळमकर यांचीच देण असल्याची भावना अतिश तोडकर याने बोलून दाखवली.

     सुवर्णपदक मिळवल्यानंतर अतिश तोडकर यांनी डॉक्टर संदीप कळमकर यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. प्रदीप कळमकर, अनुप कळमकर पैलवान आतिश तोडकर, सुनील तोडकर, कल्याण महाराज तोडकर, जनसंपर्क अधिकारी सय्यद मोहम्मद उपस्थित होते.

___________________



रुग्णांची सेवा हे कर्तव्यच ....

पैलवान अतिश तोडकर याने कुस्तीत मिळवलेले सुवर्णपदक ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. त्याने त्याची जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश मिळविले आहे. अतिशने आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिंपिक मध्ये खेळून देशाचे नाव मोठे करावे. शस्त्रक्रिया करणे तसेच गोरगरीब रुग्णांची सेवा करणे एक डॉक्टर म्हणून माझे कर्तव्यच आहे.

...... डॉ. संदीप कळमकर (अस्थिरोग तज्ञ)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post