माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर बलिदान मास मोठ्या प्रमाणात तरुणांनी पाळून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण महिना तरुणांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळण्यात आला. या संपूर्ण महिन्यात उपवास, धूम्रपान टाळणे, सांस्कृतिक उत्साहाचे कार्यक्रम टाळणे, दररोज सायंकाळी श्लोक पठण, अनवाणी राहणे अशा प्रकारे नियम पाळून छत्रपती संभाजी महाराजांप्रती आदर व्यक्त केला.
बलिदान मास कालावधी दुःखाचा असल्याने कोणत्याही प्रकारचा आनंद उत्सव साजरा न करता दुःख व्यक्त केले गेले. मंगळवार दि.२० मार्च रोजी तरुणांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ वडु बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी प्रस्थान केले. शिवप्रतिष्ठानच्या वतीने जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिरापासून धर्मवीर ज्वाला आणण्यासाठी प्रस्थान केले आहे.
Post a Comment