माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील जेऊर येथील यशश्री अकॅडमी संचलित जेऊर प्री स्कूल आणि विघ्नहर्ता सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अथर्व टेस्ट ट्यूब बेबी, मॅटर्निटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त गुरुवार दि. ९ मार्च रोजी खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यशश्री अकॅडमी संचलित जेऊर प्री स्कूल आपल्या शाळेमध्ये वर्षभर नवनवीन उपक्रम राबवत असतात तसेच विघ्नहर्ता हॉस्पिटलही ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सदैव पुढाकार घेत असते. गुरुवार दि. ९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत यशश्री प्री स्कूल जेऊर अनंत बंगला, बस स्टॉप जवळ नगर औरंगाबाद रोड येथे शिबिर संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जेऊर सरपंच सौ. ज्योती तोडमल, बहिरवाडी सरपंच सौ.अंजना येवले, धनगरवाडी सरपंच सौ. शुभांगी शिकारे, डॉ. अर्चना कर्डिले, डॉ. दिपाली वाबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये महिलांच्या विविध आजारांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिला विविध आजारांनी ग्रस्त असताना देखील उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. परंतु वेळीच आजाराचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार केल्याने आजार बरा होतो. परंतु उपचारा अभावी भविष्यात शरीरात विविध गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व मार्गदर्शन ठेवण्यात आले असल्याची माहिती स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. निलोफर धानोरकर तसेच स्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ञ डॉ. सुप्रिया वीर यांनी दिली.
शिबीरामध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ. महेश वीर, कृत्रिम सांधेरोपण अर्थोस्कोपी तज्ञ डॉ. अखिल धानोरकर, अस्थिरोग तज्ञ डॉ. अमित कुलांगे, एम.डी. मेडिसिन डॉ. अजय साबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शिबिराचे आयोजन व यशस्वीते साठी यशश्री अकॅडमीच्या संचालिका सौ. अनुरीता शर्मा, क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार, जेऊर प्री स्कूलच्या प्राचार्या सौ. मनीषा पवार, सर्व शिक्षक तसेच विघ्नहर्ता हॉस्पिटलचे प्रशासन प्रयत्नशील आहे. तरी जेऊर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
_________________________
जेऊर प्री स्कूल प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
जेऊर येथील प्री स्कूल मध्ये नूतन वर्षासाठी * नर्सरी * एलकेजी * युकेजी वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली आहे.
प्रवेशासाठी संपर्क :- प्राचार्य सौ. मनीषा पवार
मोबाईल नंबर-७०२०८९७०४९
______________________________
Post a Comment