माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डीले, नगर तालुका महाविकास आघाडीकडून ऑफर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -स्व. कै. माजी खासदार दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्याने आणि उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने नगर तालुक्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील मातब्बर नेत्यांना रिंगनात उतरवले जाणार असल्याचे दिसून येत आहे. खडकी गावचे विद्यमान सरपंच प्रवीण कोठुळे हे बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे बोलले जाऊ लागले असून तशी विचारणा माजी राज्यमंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले गट व नगर तालुका महाविकास आघाडीकडून झाली असल्याची माहिती आहे.
स्व. कै. माजी खासदार दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. गत वर्षी बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा नेते शिवाजी कर्डीले, माजी सभापती भानुदास कोतकर, आमदार अरुणकाका जगताप गटाविरुद्ध नगर तालुका महाविकास आघाडी असा सामना रंगला होता. त्यात कर्डीले-कोतकर-जगताप गटाला एकहाती सत्ता मिळविण्यात यश आले. यंदाही कर्डीले-कोतकर-जगताप गटा विरुद्ध नगर तालुका महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. त्यातच दोन्ही गटाकडून तालुक्यातील 'वजनदार' नेत्यांना उमेदवारी बाबत विचारणा केली जातं आहे. गत बाजार समितीच्या निवडणुकीवेळी ही सरपंच प्रविण कोठुळे यांना दोन्ही गटाकडून विचारणा झाली होती. त्यावेळी त्यांनी उमेदवारी करण्यास नकार दिला होता. सरपंच कोठुळे यांचा परिसरातील जनाधार, तालुक्यातील नातगोत यामुळे पुन्हा यंदाही दोन्ही गटाकडून उमेदवारीची विचारणा होत आहे. खडकी पंचक्रोशीतून उमेदवारीची आग्रही मागणी होत आहे. परंतु सरपंच कोठुळे बाजार समितीची उमेदवारी करतात की कसे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. उमेदवारी केलीच तर कर्डीले गटाकडून की नगर तालुका महाविकास आघाडीकडून हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Post a Comment