प्रतिक्षा बागडी पहिली महाराष्ट्र केसरी; वैष्णवी पाटील हिचा पराभव

 


माय अहमदनगर वेब टीम 

पुणे - महिला महाराष्ट्र केसरीसाठी झालेल्या लढतीत आज प्रतिष्ठेचा किताब प्रतिक्षा बागडी हीन पटकावला. तिने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटील हिचा तिने अवघ्या एका मिनिटांतच पराभव केला. 4-3 अशी आघाडी घेत तिने हा विजय संपादन केला. विजयानंतर ''मला अत्यंत आनंद झाला'' अशी प्रतिक्रीयाल प्रतिक्षा बागडी हिने दिली आहे.


उपांत्य फेरीत प्रतिक्षा आणि वैष्णवी पाटील यांनी दणदणीत विजय मिळवले होते. प्रतिक्षाने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर 9-2 असा दमदार विजय मिळवला होता. या लढतीत प्रतिक्षाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला होता आणि तिचा तिला फायदा झाला होता. प्रतिक्षाला यावेळी 2 गुण गमवावे लागले असले तरी तिने 9 गुणांनची दमदार कमाई केली होती.


प्रतिक्षा ही वसंतदादा कुस्ती केंद्र सांगली येथे कुस्तीचे धडे गिरवत आहे.तिला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले ते म्हणजे वडील रामदास बागडी हे जुन्या काळातील नामवंत मल्ल.ते सध्या सांगली पोलीस दलात कार्यरत आहेत. प्रतिक्षाची आजवरची कामगिरी बघितली तर तिने तब्बल 12 वेळा राज्य स्पर्धेत पदके मिळवली आहेत आणि 22 वेळा राष्ट्रीय पातळीवर सहभाग आहे.


महिला कुस्तीची मान उंचावली

महाराष्ट्राच्या महिला कुस्तीला उत्कृष्ट दर्जा मिळवून देण्याचे श्रेय खेळाडू म्हणून प्रतिक्षाला जाते.तिच्या यशानंतर बऱ्याच मुली कुस्तीत आल्या आणि पालकांचाही प्रतिसाद मुलीसाठी खूप महत्वाचा ठरत आहे.सध्या ती के.बी.पी.कॉलेज इस्लामपूर येथे पहिल्या वर्षात शिकत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post