युवा उद्योजक अजय लामखडे यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीस बळकटी; लामखडे कुटुंबातील सदस्य प्रथमच बाजार समितीच्या रिंगणात

राजकीय वारसा अन् मोठा जनसंपर्क याचा होणार फायदा

माय अहमदनगर वेब टीम

 नगर तालुका- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत १६ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

        महाविकास आघाडीकडून निंबळक गावचे सुपुत्र युवा उद्योजक अजय लामखडे यांना सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अजय लामखडे यांची बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात 'एन्ट्री' झाली आहे. लामखडे कुटुंबाचा तालुक्याच्या राजकारणात चांगलाच दबदबा आहे. स्वर्गीय विलासराव लामखडे ( नाना ) यांनी निंबळक गावच्या सरपंच पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. स्वर्गीय विलासराव यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क तसेच मोठा मित्रपरिवार होता. चुलते माधवराव लामखडे जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांचे तालुक्यातील राजकारणात चांगलेच 'वजन' आहे.



        स्वर्गीय विलासराव यांच्या स्नुषा सौ. प्रियंका लामखडे निंबळक गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळत आहेत. अजय लामखडे यांना बालपणापासूनच राजकारणाचे बालकडू घरातूनच मिळालेली देणगी आहे. लामखडे कुटुंबाचे चाळीस वर्षापासून निंबळक गावातील ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. तसेच सोसायटीमध्येही लामखडे कुटुंबाचेच वर्चस्व आहे. एकाच कुटुंबाकडे एवढी वर्षे सत्ता राहणे हे तालुक्यातील एकमेव उदाहरण आहे. अन् सत्ता अबाधित राहण्यासाठी लामखडे कुटुंबीयांचा गावासाठी तेवढा त्यागही आहे. सर्वांच्या सुखदुःखात, अडीअडचणीच्या काळात सहभागी होणे. मदत करणे सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करणे हे कौशल्य लामखडे कुटुंबाने आत्मसात केलेले आहे.

        जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांचे पुतणे व माजी सरपंच स्वर्गीय विलासराव यांचे चिरंजीव अजय लामखडे यांनी बाजार समितीच्या रिंगणात उडी घेतल्याने निश्चितच त्यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना फायदा होणार असल्याचे गणित राजकीय अभ्यासक मांडत आहेत. माधवराव लामखडे तसेच स्वर्गीय विलासराव यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अजय लामखडे राजकारणात, समाजकारणात कार्य करत आहेत. 

       अजय लामखडे यांच्याकडे आमदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक म्हणून पाहिले जाते. तालुक्यात असलेला जनसंपर्क यामुळे त्यांना निवडणुकीत निश्चित फायदा होणार असल्याचे दिसून येते. आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे,  घनश्याम आण्णा शेलार, माधवराव लामखडे, बाळासाहेब हराळ, प्रताप पाटील शेळके, रावसाहेब पाटील शेळके यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास अजय लामखडे यांनी व्यक्त केला आहे. एकंदरीत युवा उद्योजक अजय लामखडे यांची उमेदवारी निश्चितच महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात येते.

_____________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post