उद्योजक अजय लामखडे यांना मिळतोय भरघोस प्रतिसाद

 


माय नगर वेब टीम 

अहमदनगर - नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सोसायटी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार युवा उद्योजक अजय विलासराव लामखडे यांना तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्योजक अजय लामखडे हे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे विश्‍वासू मानले जातात.



नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारांना चिन्ह वापट झाले असून उमेदवार मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना छत्री चिन्ह मिळाले आहे. दरम्यान, नगर तालुका बाजार समिती निवडणूक जाहीर झाल्यापासूनच उद्योजक अजय लामखडे यांची उमेदवारी चर्चेत होती. तसेच त्यांची उमेदवारी अंतीम मानली जात होती. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याच्या पहिल्या दिवसापासून नगर तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत (दि.20 एप्रिल) तालुक्यातील गावागावात जाऊन त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. शुक्रवारी चिन्ह वाटप झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना छत्री चिन्ह मिळाले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्योजक अजय लामखडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.



मतदारांच्या भेटी दरम्यान आगामी काळातील बाजार समिती कशी असेल याचे व्हिजन मतदारांसोर ते मांडत आहेत. तसेच महाविकास आघाडीचा जाहीनामा मतदारांसोर ते मांडत आहेत. उद्योजक तथा जिल्हा परिषद सदस्य माधवराव लाखडे, स्व. माजी सरपंच विलासराव लामखडे यांचा तालुक्यात दांडगा जनसंपर्क असल्याने त्याचा मोठा फायदा युवा उद्योजक अजय लामखडे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post