*उपाध्यक्षपदी संजय ठोंबरे, सचिवपदी ज्ञानदेव गोरे, खजिनदारपदी रवि कदम यांच्याही एकमताने निवडी*
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक नवा मराठाचे उपसंपादक सुनिल हारदे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यावेळी संघाच्या उपाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे वार्ताहर संजय ठोंबरे, सचिवपदी पुढारीचे वार्ताहर ज्ञानदेव गोरे, खजिनदारपदी दैनिक प्रभातचे उपसंपादक रवि कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
नगर तालुका पत्रकार संघाची विशेष सभा शुक्रवारी (दि.१२) दुपारी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी दत्ता इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व संघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्याबाबत चर्चा झाली. तसेच अध्यक्षपदासाठी सुनिल हारदे यांची फेरनिवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर सर्व कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी सुनील चोभे (निवासी संपादक, दै.नगर सह्याद्री), भाऊसाहेब होळकर ( उपसंपादक, दै.समाचार ), आजिनाथ शिंदे (उपसंपादक, दै.नगर स्वतंत्र), अविनाश निमसे (तालुका प्रतिनिधी, दै. नगरी दवंडी) असे संघातील सर्व १० सदस्य उपस्थित होते.
या निवडीबद्दल नूतन कार्यकारिणीचे नगर तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक विठ्ठल लांडगे (संपादक, दै.लोकआवाज), राजेंद्र झोंड (निवासी संपादक दै.पुण्यनगरी), ज्ञानेश्वर निमसे (उपसंपादक दै.पुढारी), उदय धामणे (उपसंपादक, दै.लोकमत), गोरक्षनाथ बांदल (उपसंपादक, दै.सकाळ) आदींनी अभिनंदन केले.
Post a Comment