माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : नगर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या बाबुर्डी बेंद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी उद्धव सुरेश चोभे तर व्हाईस चेअरमनपदी येणूताई आप्पासाहेब खेंगट यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव रावसाहेब काळे, सहाय्यक सचिव सोहम चोभे यांनी काम पाहिले.
बाबुर्डी बेंद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन निवडीची सभा शनिवारी पार पडली. यावेळी चेअरमनपदासाठी उद्धव चोभे, तर व्हाईस चेअरमनपदासाठी येणूताई खेंगट यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. चेअरमन उद्धव चोभे यांच्या अर्जावर रेवनणाथ चोभे सूचक तर पोपट चोभे अनुमोदक आहेत. व्हाईस चेअरमन येणूताई खेंगट यांच्या अर्जावर माजी चेअरमन सतिष चोभे सुचक तर माजी व्हाईस चेअरमन अनुमोदक आहेत. दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.
बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा संचालक व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रेनणनाथ चोभे, माजी सरपंच दिलीप चोभे, ज्येष्ठ नागरिक राजाराम चोभे, माजी सरपंच दिपक साळवे, काशिनाथ चोभे, माजी उपसरपंच संदीप चोभे, माजी चेअरमन सतिष चोभे, बिभीषण खेंगट, माजी व्हाईस चेअरमन महेश चोभे, संचालक पोपट चोभे, ग्रामपंचायत सदस्य शरद चोभे, विजय वाळके, भाऊसाहेब निमसे, प्रकाश चोभे, शिवाजी चोभे, तुषार चोभे, ज्ञानेश्वर वाळके, प्रमोद चोभे, अक्षय खेंगट, इंद्रजित चोभे, आबासाहेब चोभे, भानुदास मोहिते, दुर्योधन खेंगट, रविंद्र रोकडे आदी उपस्थित होते.
Post a Comment