माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील जेऊर येथील भवानी माता मंदिर जिर्णोध्दाराचे काम प्रगतीपथावर आहे. भवानी माता मंदिर जीर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्यात येत आहे.
गर्भगिरीच्या उंच टेकडीवर डोणी परिसरात भवानी माता मंदिर वसलेले आहे. येथील निसर्गरम्य वातावरण तसेच जागृत देवस्थान म्हणून वर्षभर येथे भाविकांची मांदियाळी असते. परिसरात मुक्तपणे बागडणारे वन्य प्राणी तसेच पक्षी यामुळे येथील वातावरण प्रसन्नमय बनलेले आहे.
मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम लोकवर्गणीतून सुरू करण्यात आलेले आहे. जेऊर पंचक्रोशीत विविध शुभकार्याप्रसंगी सत्कार व इतर खर्चाला फाटा देत मंदिर जिर्णोध्दासाठी आर्थिक मदत देण्याचा पायंडा परिसरात पडलेला आहे. भवानी माता मंदिराला आकर्षक रंग रंगोटी, विद्युत रोषनाई, सभामंडप बनविण्यात येणार आहे.
उंच टेकडीवर वसलेले भवानी मातेचे मंदिर भक्तांबरोबर पर्यटकांना देखील भुरळ पाडत आहे. मंदिर जिर्णोध्दाराचे काम अंतिम टप्प्यात असून जीर्णोद्धारासाठी मदत करण्याचे आवाहन जय भवानी मंदिर समितीच्या वतीने गोरक्षनाथ पोपटराव काळे, किसनराव काळे, संजय काळे, सुभाष काळे, सुरेश काळे,दामोधर काळे, गोरख निवृत्ती काळे, पोपट रंगनाथ काळे, प्रकाश काळे, रवींद्र काळे, राजेंद्र काळे, आदींनी केले आहे.
Post a Comment