माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे मत जय भवानी उद्योग समूहाचे संचालक संतोष काळे यांनी व्यक्त केले. नेवासा तालुक्यातील श्रीराम देवस्थान देवगाव दिंडीचे नगर तालुक्यातील जेऊर येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
जय भवानी उद्योग समूहाचे संचालक संतोष काळे, हर्षल तोडमल, आकाश तोडमल, मयूर तोडमल यांनी दिंडीचे मार्गदर्शक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा सत्कार केला. दरवर्षी जय भवानी उद्योग समूहाच्या वतीने देवगाव दिंडीचे स्वागत करण्यात येत असते.
याप्रसंगी बोलताना संतोष काळे यांनी वारकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. अनेक जण वारकऱ्यांमध्ये विठुरायाला पाहत असून वारकऱ्यांची सेवा करत असतात. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी मोठ्या भक्ती भावाने पंढरपूरला पायी जात असतात. संपूर्ण महिना राज्यात भक्तिमय वातावरण झालेले बघावयास मिळते. सर्व महामार्गावर विठुरायाच्या जय घोषाचा आवाज दुमदुमत असतो. नागरिकांनीही आपआपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे आवाहन देखील काळे यांनी केले आहे.
Post a Comment