माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. महंत राधाताई सानप (श्री क्षेत्र मीराबाई संस्थान महासांगवी, जिल्हा बीड) तसेच ह. भ.प. बाळकृष्ण महाराज केंद्रे उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ह. भ. प. राधाताई सानप यांचे कीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. ह.भ. प. राधाताई सानप यांनी अहिल्यादेवीच्या जीवनपटा विषयी माहिती सांगितली.
ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सौ. शुभांगी शिकारे व सौ. सुनीता पवार यांना प्रदान करण्यात आला. प्रतीक्षा पादीर पोलीस दलात भरती झाल्याबद्दल तर मच्छिंद्र गवळी व विष्णू शिकारे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव भांड, उपाध्यक्ष बाबुराव मंचरे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. लक्ष्मणराव विरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, आजी-माजी सदस्य, समस्त ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
Post a Comment